Tuesday, August 12, 2025

🔴 शाळा शिडवणे नं. १ मध्ये 'रांगोळी' स्पर्धेचे उत्साहात आयोजन; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव



🔴 शाळा शिडवणे नं. १ मध्ये 'रांगोळी' स्पर्धेचे उत्साहात आयोजन; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

स्थळ: शिडवणे, दिनांक: १४ ऑगस्ट, २०२५

          विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळा शिडवणे नं. १ मध्ये १३ आणि १४ ऑगस्ट, २०२५ रोजी 'रांगोळी' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व गटांतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत.

          या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे तीन गट पाडण्यात आले आहेत. इयत्ता पहिली आणि दुसरीच्या पहिल्या गटात समर्थ वाघरे, श्रावणी सुतार, सानवी भोवड, मैथिली टक्के, यामिनी सुतार, आर्वी येतकर, ऋग्वेद सुतार, गौतम पाष्टे आणि यश धाक्रस सहभागी झाले आहेत.

          इयत्ता तिसरी आणि चौथीच्या दुसऱ्या गटात सार्थक कुडतरकर, शर्वरी पाळेकर, विधी शिंदे, रिया कुडतरकर, आर्या रांबाडे, जान्हवी वारीसे, मयुरी सुतार, यश लाडके, कार्तिक सुतार आणि राहुल वारीसे हे आपल्या कलाकृती सादर करणार आहेत.

          तर इयत्ता पाचवी ते सातवीच्या तिसऱ्या गटात धनश्री सुतार, साक्षी पाष्टे, शुभ्रा पांचाळ, श्रेयांश पांचाळ, आयुष येतकर, आर्यन कासार्डेकर, विघ्नेश सुतार, उत्कर्ष टक्के, वैष्णवी टक्के, सबा शेख, श्रावणी पाष्टे, धनुष लाडके, तनिष्का पाटणकर, जोया शेख, फरीन शेख, शफा शेख, श्रावणी भोवड आणि अनुष्का जाधव अतिशय सुंदर रांगोळ्या साकारणार असून सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

          या स्पर्धेत प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या काढून आपली सर्जनशीलता दाखवतील.  स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल आणि विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला आणि संस्कृतीबद्दल अधिक आवड निर्माण होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...