🔴 शाळेच्या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीसाठी मदतीबद्दल आभार
आमच्या शाळेतील पाण्याच्या टाकी क्रमांक एकचा पाया खचला होता. तो दुरुस्त करण्यासाठी, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मा. दिनेशजी रांबाडे, यांच्या पुढाकाराने आणि आर्थिक मदतीने श्रमदानातून हे काम पूर्ण झाले.
या कामासाठी लागणारी वाळू मा. समीर कुडतरकर (पोलीस पाटील), जे विद्यमान शाळा व्यवस्थापन समिती सदस्य देखील आहेत, यांनी मोफत दिली. याशिवाय, त्यांनी सुतारवाडीकडे जाण्याचा रस्ताही (गडगा) व्यवस्थित करून दिला.
या कामात प्रत्यक्ष सहभागी झालेले मा. महेश रांबाडे आणि शिवाजी वारिसे यांचेही आम्ही विशेष आभार मानतो.
या शैक्षणिक कामासाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आणि श्रमदान करणाऱ्यांचे आम्ही शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तुमच्या सहकार्यामुळेच हे काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकले.
आपले,
शिक्षकवृंद
शाळा शिडवणे नं. १

No comments:
Post a Comment