Friday, June 30, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेत मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न

 🛑 शिडवणे नं.१ शाळेत मोफत वह्या वितरण कार्यक्रम संपन्न

🔹 सामाजिक कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिका शिवसेना माजी नगरसेवक बाळा नरसाहेब यांचे सौजन्य

🔸शिडवणे : 

          दरवर्षी शिडवणे नं.१ शाळेला शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शिक्षणप्रेमी देणगीदारांकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. वारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मुंबई महानगरपालिका शिवसेना माजी नगरसेवक बाळा नरसाहेब यांच्या सौजन्याने व ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकरसाहेब यांच्या प्रयत्नाने यावर्षी 51 विद्यार्थ्यांना लॉंगबुक वह्यांचे वाटप करण्यात आले. 

          मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीदेवी शारदामाता आणि गणपती मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मान्यवरांनी सर्व मुलांना वह्यांचे वाटप केले. मुलांना वह्या मिळाल्याबद्दल सर्व मुलांनीही आनंदाने वह्यांचा स्वीकार केला. 

          त्यावेळी राष्ट्रपतीपदक पुरस्कारप्राप्त निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , निवृत्त कृषी अधिकारी बंडू कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. देणगीदार यांनी मुलांसाठी दिलेल्या शैक्षणिक वस्तुरुप योगदानाबद्दल आभार व्यक्त केले. त्यावेळी मार्गदर्शन करताना बंडू कोकाटे म्हणाले , " मुलांनो , तुम्ही आज देणगी स्वीकारत आहात , मोठे झाल्यानंतर तुम्हीही असेच देणगीदार व्हा. आम्ही आमच्या काळात दैनंदिनी लिहित असू. तुम्हीसुद्धा दररोज डायरी लिहिली पाहिजे. " 

          विजय टक्के म्हणाले , " मुलांनो , तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला मोफत स्वरुपात शैक्षणिक साहित्य मिळते आहे. अभ्यासात यश मिळविण्यासाठी आपल्या जन्मजात बुद्धीचा वापर करा. पूर्वी आम्ही पाटीवर अक्षरे गिरविली आहेत. मला तुम्हाला या पाटीवर अक्षरे गिरविताना पुन्हा बघायचे आहे. मी तुमच्यासाठी आणि शाळेसाठी काही पाट्या आणून देईन. त्यावर लिहा आणि मोठे अधिकारी बना. तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा." 

          त्यावेळी शिडवणे ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर , शांताराम धुमाळ , स्मिता टक्के , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , मंजुळा गुंडये , मनोहर कोकाटे , प्रेरणा कासार्डेकर , सचिन टक्के , माजी उपसरपंच अनिल पांचाळ , दिपक बोभाटे , परशुराम पाष्टे , सदानंद टक्के , दत्तात्रय नामये , विठोबा पाष्टे , तारीफ शेख , सचिन सुतार , स्नेहा पांचाळ , मेघना सुतार , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर इत्यादी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ग्रा.पं. सदस्य दयानंद कुडतरकर आणि शिक्षणप्रेमी दिपक बोभाटे यांचे विशेष आभार मानले.

          मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.




































































सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...