Wednesday, June 21, 2023

प्रत्येकाने आपली सकाळ योगाभ्यासाने सुरु करा : शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये

🛑 शिडवणे नं.१ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

🔹ग्रामपंचायत शिडवणे यांची विशेष उपस्थिती

शिडवणे : 

          मुलांनी , पालकांनी आणि शिक्षकांनी आपली जीवनशैली योगमय केली पाहिजे. आपलं मन सुंदर घडवायचे असेल तर प्रत्येकाने आपली सकाळ योगाभ्यासाने सुरु करा असे प्रतिपादन शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये यांनी शिडवणे नं.१ शाळेत योग दिनी केले. 

          मुलांच्या प्रारंभिक हालचाली घेण्यात आल्या. योगशिक्षक व शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी योगविषयक सविस्तर मार्गदर्शन करुन योगासनांची प्रात्यक्षिके करुन घेतली. योग प्रार्थना घेतली. ध्यानात्मक , शयन आणि विपरीत शयन स्थितीतील आसने घेण्यात आली. पद्मासन , स्वस्तिकासन , सुखासन , ओमकार मंत्र , शांती मंत्र , ताडासन , वृक्षासन , पश्चिमोतानासन , शशांकासन , मार्जारासन , धनुरासन , हलासन , नौकासन , भुजंगासन , शलभासन , मकरासन , पवनमुक्तासन , वज्रासन , त्रिकोणासन , शवासन इत्यादी योगासने घेण्यात आली.

          त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य शांताराम धुमाळ , सुप्रिया पाष्टे , सुप्रिया पांचाळ , स्मिता टक्के , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार , अंगणवाडी मदतनीस केतकर , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर , आरोग्य सहाय्यक प्रवीण भागवत , आरोग्य सेवक गणेश तेली , निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी ढेकणे आणि शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

          ढेकणे यांनी मुलांना योग विषयक अधिक मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या उत्तम नियोजनाबद्दल सरपंच रविंद्र शेट्ये आणि सदस्य यांनी शिक्षकांचे कौतुक केले.












































































































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...