Friday, February 21, 2025

वनभोजन : नाधवडे उमाळा : २१ फेब्रुवारी २०२५

        शिडवणे नं .  १  शाळेचे २०२४ - २५  चे वनभोजन नाधवडे उमाळा या निसर्गरम्य स्थळी अतिशय दिमाखात संपन्न झाले .  त्यावेळी शाळेतील व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी , शिक्षकवृंद , शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते .  

          मुलांनी सकाळी ९  वाजता शाळेकडून प्रयाण केले. गांगेश्वराला नारळ ठेवून व गाऱ्हाणे घालून वनभोजनाला जाण्यासाठी मुले व सर्वजण तयार झाली .  नाधवडे गावातील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील जागृत देवस्थान आहे .  तेथे कायमचा झरा वाहत असताना सर्व मुलांनी पाहिला. पाण्याचे प्राशन करुन तहान भागवली .  

            गेल्यानंतर सर्व महिला पदाधिकारी यांनी मुलांसाठी चवदार भेळ बनविली .  मुलांनी त्यावर आनंदाने ताव मारला .  निसर्ग निवासात बसून भेळ खाण्यातला आनंद सर्व मुले , माणसे घेताना दिसत होती .  वनात जाऊन स्वतः जेवण बनवून जेवण्याचा आनंद वेगळाच असतो .  वर्षातून एक दिवस असा साजरा करताना अधिकारी व शिक्षक मित्रांनीही सदिच्छा भेट दिली .  कासार्डे / खारेपाटण / शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवारसाहेब  आणि त्यांच्यासोबत विनायक जाधवसर , जाकीर शेखसर , संतोष वळंजूसर , भाई पाटीलसर यांच्या सदिच्छा भेटीमुळे सर्वानाच अतिशय आनंद झाला. दुपारपर्यंत मुलांनी क्रिकेट , फुटबॉल , दोरीउड्या , भेंड्या आणि अनेक खेळांचा स्वानंद घेतला .  महादेव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले .  निसर्ग सौदर्य न्याहाळले .  पाण्यामध्ये आपले पाय थंड केले .  

            जेवणापूर्वी वैभववाडी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनीही मुलांना सामान्यज्ञान विषयक अधिक माहिती दिली व सर्व मुलांना थंड पेय दिले .  त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार .  

            दुपारी ठिक दोन वाजता सर्व मुलांनी कुर्मा पुरी , श्रीखंड , गोड डाळ , पापड , लोणचे , भात आणि कोशिंबीर अशा स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घेतला .  त्यावेळी उपस्थित सर्वांनीच येथेच्छ भोजन केले .  सर्व महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी यांनी शाळेसाठी दिलेल्या अनमोल सहाय्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी कितीही आभार मानले तरीही कमीच पडतील .  शिडवणे गावातील सर्व पदाधिकारी आणि पालक , ग्रामस्थ यांच्या नियमितच्या सहाय्याबद्दल सर्व शिक्षकवृंदांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करीत आहोत .  मदतीला असे अनेक हात नेहमीच पुढे सरसावतात , त्यांना गांगेश्वर आणखी बळ देण्यासाठी प्रार्थना करतो .  शिडवणे नं .  १  शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी वनभोजनासाठी दिलेल्या उत्स्फूर्त साहाय्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो .  

© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं .  १ 


































































































































        

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...