Saturday, March 11, 2023

शैक्षणिक साहित्याचे वितरण

 


बालसभा : २०२३

 




बालिका दिन : २०२३

 



शाळा विकास आराखडा सभा

 


🛑 शिडवणे ग्रामपंचायतची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न

 🛑 शिडवणे ग्रामपंचायतची शैक्षणिक ग्रामसभा संपन्न

शिडवणे : निपुण भारत अभियान अंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतच्या वतीने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक ग्रामसभा संपन्न झाली. 

          प्रारंभी सर्व उपस्थित पदाधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामसेवक नलावडे यांनी प्रास्ताविक केले. शाळापूर्व शिक्षण , अंगणवाडीतील वातावरण , शैक्षणिक सुविधा याबाबत चर्चा करण्यात आली. शाळेची शैक्षणिक सद्यस्थिती , इयत्तावार अध्ययन स्तर , अध्ययन निष्पत्तीबाबत शिडवणे नं.१ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे व शिडवणे कोनेवाडीचे उपशिक्षक मंगेश खांबळकर यांनी माहिती दिली. शाळेचा शैक्षणिक विकास आराखडा व भौतिक विकास आराखडा इत्यादी माहिती सांगण्यात आली. शाळेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आवश्यक सहाय्याविषयी चर्चा करण्यात आली.निपुण भारत अभियानाकडून अपेक्षा व माहिती देण्यात आली. सरपंच रविंद्र शेट्ये यांनी शैक्षणिक ग्रामसभेला मार्गदर्शन केले. 

          बालसभा व पालकसभेत मुलांनी केलेल्या मागण्यांची यादी वाचून दाखवण्यात आली. 

          त्यावेळी शिडवणे गावचे सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ग्रामसेवक नलावडे , ग्रामपंचायत सदस्य कोमल शेट्ये , दयानंद कुडतरकर , शांताराम धुमाळ , सुप्रिया पांचाळ , सुप्रिया पाष्टे , स्मिता टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , मंजुळा गुंडये , तारीफ शेख , आशा सेविका आरती शिंदे , अंगणवाडी सेविका पाटणकरबाई , लवेश कासार्डेकर , सेजल भोवड , समृद्धी पाटणकर , चिन्मय पाटणकर , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर , पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल आणि शिडवणे गावातील बहुसंख्य पालक , ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे आभार मानले.



🛑 शिडवणे नं.१ शाळेत जागतिक महिला दिन साजरा

 🛑 शिडवणे नं.१ शाळेत जागतिक महिला दिन साजरा

शिडवणे : 

          दरवर्षी ८ मार्च रोजी  जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. शिडवणे नं. १ शाळेत ' जागतिक महिला दिन ' अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. 

          यावेळी उपस्थित शाळेतील उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार , अंगणवाडी सेविका पाटणकरबाई , मदतनीस केतकरबाई यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. 

          धनश्री सुतार हिने ' घे भरारी नारीशक्ती ' या गीतावर नृत्य सादर केले. शफा शेख , जोया शेख , फरीन शेख , अनुष्का जाधव , तनिष्का पाटणकर , श्रावणी भोवड या मुलींनी एक समूहनृत्य सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली. 

          उपाध्यक्षा समिता सुतार यांनी महिलांच्या सबलीकरणावर आधारित एका कवितेचे सुमधुर गायन केले. अंगणवाडी सेविका पाटणकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका सुजाता कुडतरकर आणि सीमा वरुणकर या दोन्ही शिक्षकांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल आणि मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील सर्व मुलामुलींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.






🛑 गणित अध्ययन संस्थेच्या स्पर्धेत शिडवणे नं. १ शाळेचे यश

🛑 गणित अध्ययन संस्थेच्या स्पर्धेत शिडवणे नं. १ शाळेचे यश
🔸 अपूर्णांक व दशांश अपूर्णांक ऑलिम्पिक 2022 - 23
🔹अल्केमी कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीचा उपक्रम
शिडवणे : 
          अल्केमी कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड   यांच्या आर्थिक साहाय्यातून गणित अध्ययन संस्था गणित विषयक ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करीत असते. इयत्ता पाचवीच्या वर्गाची ऑलिम्पिक कणकवली नं.३ शाळेत नुकतीच संपन्न झाली. त्यात शिडवणे नं.१ शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. 
          त्यामध्ये वेदांत कुडतरकर , श्रेया पाळेकर , सुशांत गुंडये , फरान शेख , केतन सुतार , सार्थक धुमाळ , सर्वेश पाष्टे , हर्षद रांबाडे या आठ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. 
          तालुकास्तरीय संपन्न झालेल्या गणित ऑलिम्पिकमध्ये शिडवणे नं. १ शाळेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. याबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले आहे. पाचवीच्या वर्गशिक्षिका सुजाता प्रल्हाद कुडतरकर आणि पाचवीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुनिल तांबेसर यांनी विशेष  अभिनंदन केले आहे.  गणित अध्ययन संस्थेच्या या उपक्रमाबद्दल शिडवणे नं.१ शाळेच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत.

शिडवणे नं.१ शाळेचे विद्यार्थी व शिक्षक गणित अध्ययन संस्थेकडून ट्रॉफी स्वीकारताना


सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...