Saturday, November 4, 2023

स्नेहभोजन व सरपंच साहेब यांचा वाढदिवस

 🛑 स्नेहभोजन आणि वाढदिवस

          सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर शिडवणे नं.१ शाळेमध्ये शिडवणे सरपंच मा. रविंद्रजी शेट्येसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ' स्नेहभोजन उपक्रम ' संपन्न झाला. 

          त्यावेळी उपस्थित सर्वांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या महिलांच्या व मुलांच्या रांगोळ्यांचे कौतुक केले. सहभागी सर्वांना मान्यवरांच्या शुभहस्ते वस्तूरुप भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. एकूण 13 सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. सरपंचसाहेब यांना मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व स्वतः बनविलेली भेटकार्डे दिली. केतन सुतार याने सुंदर कविता गायन केले. शालेय स्वराज्य मंडळाचा मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर याने सरपंच साहेबांना शुभेच्छा दिल्या. श्रेया पाळेकर हिने हृदय मनोगत व्यक्त केले. माजी वित्त व बांधकाम सभापती मा. रविंद्रजी जठारसाहेब , सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी मा. बी.एस.कोकाटेसाहेब , राष्ट्रपती पोलीसपदक प्राप्त निवृत्त पोलीस अधिकारी मा. विजयजी टक्के साहेब , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तथा पोलीसपाटील मा. समीर कुडतरकरसाहेब  यांनी सरपंच साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रांगोळी स्पर्धकांचे सर्वांनी मुक्तकंठाने कौतुक केले. 

          सरपंचसाहेब यांचे महिला पदाधिकारी यांनी औक्षण केले. सरपंच साहेबांनी शाळेतील मुलांसोबत केक कापून आनंद द्विगुणित केला. मुलांना गोड पुरणपोळ्या आणि गोड भोजनाचा आस्वाद दिला. महिला पदाधिकारी यांनी विविध प्रकारे सहकार्य केल्याने कार्यक्रम उत्तमप्रकारे संपन्न होऊ शकला. 

          शालेय पोषण आहार अंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सरपंच साहेब यांचे विशेष आभार मानण्यात आले.त्यावेळी शिडवणे उपसरपंच मा. दिपक पाटणकर , शिक्षणतज्ज्ञ मा.मनोहर कोकाटे , तंटामुक्ती अध्यक्ष मा. महेंद्र टक्के , मा. संतोष टक्के , मा. कृष्णा केतकर , मा. तारीफ शेख , ग्रामपंचायत सदस्या मा. सुप्रिया पांचाळ , मा. सुप्रिया पाष्टे , मा. स्मिता टक्के , मा. कोमल शेट्ये आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. महेंद्रजी धुमाळ , डॉ. संजय कोकाटे आणि बहुसंख्य शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य , माता पालक संघ सदस्य , शिक्षकवृंद उपस्थित होते.  

          मुख्याध्यापक प्रवीण कुबलसर यांनी सर्वांचे आभार मानले.



























रक्तगट व रक्त तपासणी शिबीर

 









मेरी मिट्टी , मेरा देश

 



सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...