शिडवणे नं. 1 शाळेच्या मुख्य स्वयंपाकी शालेय पोषण आहार ताई समिता सुरेश सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी समिता सुतार मॅडम यांनी सर्व मुलांना गोड शिरा खाऊ दिला. शाळेच्या वतीने व सर्व समित्यांच्या वतीने समिता सुतार मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Friday, March 21, 2025
Sunday, March 16, 2025
⭕ English Languague विषयक सन्माननीय सुधाकर भोवडसाहेब यांजकडून मार्गदर्शन
⭕ English Languague विषयक सन्माननीय सुधाकर भोवडसाहेब यांजकडून मार्गदर्शन
शिडवणे नं. 1 शाळेमध्ये आज सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सन्माननीय सुधाकर भोवड साहेब यांनी इंग्रजी विषयक मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी इंग्रजीचे महत्त्व स्पष्ट केले. इंग्रजी ही जगाची भाषा असून ती सर्वांना आली पाहिजे याबद्दल त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी सर्व मुलांनी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे व सराव केला पाहिजे असेही ते म्हणाले.
ज्याची इंग्रजी चांगली असेल ते मुलाखतीमध्ये चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकतात व चांगल्या नोकरीचा त्यांना लाभ मिळू शकतो असे ते म्हणाले.
शाळेच्या वतीने त्यांना टेड टॉक्स नावाचे पुस्तक आणि गुलाबपुष्प देण्यात आले. सन्माननीय सुधाकर भाऊसाहेब यांनी शाळेसाठी रॅपिडेक्स इंग्लिश नावाचे पुस्तक सप्रेम भेट दिले. त्यामधील संभाषण नमुने यांचा सराव करण्यासाठी रॅपिडेक्स हे पुस्तक अतिशय चांगले असल्याचे ते म्हणाले.
सर्व मुलांनी त्यांना असे आश्वासन दिले की यापुढे आम्ही इंग्रजीचे वाचन आणि संभाषण करू. पुढील भेटीमध्ये सर्व मुले वीस वाक्य मराठी आणि इंग्रजी मध्ये म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
सन्माननीय सुधाकरजी भोवड साहेब यांनी इंग्रजी विषयक विद्यार्थीजागृती केल्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.
इंग्रजी विषयक मार्गदर्शनाचा लाभ इयत्ता तिसरी ते सातवीच्या सर्व मुलांनी घेतला. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल सर यांनी त्यांचे आभार मानले.
Saturday, March 8, 2025
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...





















































































































