Friday, July 28, 2023

🛑 अध्ययन संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या गणित प्रकल्पात शिडवणे नं.१ शाळेचा सहभाग

🔹 इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी संस्थेचे गणित विषयक अभ्यासपूरक उपक्रम

▪️शिडवणे : 

           गेली काही वर्षे गणित विषयक मार्गदर्शन , प्रकल्प व स्पर्धा उपक्रम राबवणारी ' गणित अध्ययन संस्था ' पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी अभ्यासपूरक उपक्रम राबवित आहे. 

          या प्रकल्पात शिडवणे नं.१ शाळेची निवड झालेली आहे. यामध्ये शाळेतील पाचवी ते सातवीच्या एकूण 21 मुलांचा सहभाग असणार आहे. विभाज्यता , दशांश अपूर्णांक यांचा अभ्यास केल्यानंतर यंदा अध्ययन संस्थेने मुलभूत मोजमापन यावर भर दिलेला आहे. त्यासाठी प्रथम मुलांची पूर्वचाचणी घेण्यात आली आहे. शाळेतील 5 ते 7 चे वर्ग शिकविणारे शिक्षक गणित विषयक मार्गदर्शन करणार आहेत. 

          कोळोशी हडपीड हायस्कुलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या शिक्षक प्रशिक्षणामध्ये अध्ययन संस्थेच्या प्रकल्प संचालिका सविता आयरे आणि समिती सदस्य शंकर अंधारे यांनी प्रात्यक्षिकासह विविध घटकांचे मार्गदर्शन केले. त्यावेळी शिडवणे नं.१ शाळेच्या समन्वयक वैष्णवी काणकेकर उपस्थित होत्या. 

          अध्ययन संस्थेने शाळेला उत्तम दर्जाचे गणित अध्यापन साहित्य प्रदान केले. शाळेला या प्रकल्पात सहभागी करुन घेतल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी अध्ययन संस्थेचे आभार मानले आहेत.

Sunday, July 23, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेत उत्कर्षा कार्यशाळा संपन्न

🔹 किशोरवयीन मुली व त्यांच्या माता पालकांना विशेष मार्गदर्शन

🔸 चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यांवर करण्यात आले मार्गदर्शन

शिडवणे : 

          उत्कर्षा उपक्रमांतर्गत शाळांमध्ये किशोरवयीन मुलींना व माता पालकांना ' मासिक पाळी व्यवस्थापन ' विषयक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. शिडवणे नं.१ शाळेत या उपक्रमाची जुलै महातील पहिली कार्यशाळा संपन्न झाली. 

          त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा समिता सुतार , ग्रामपंचायत सदस्या स्मिता टक्के आणि बहुसंख्य माता पालक उपस्थित होते. 

          मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुख्याध्यापक यांनी चांगला स्पर्श , वाईट स्पर्श या विषयावर उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. तसेच उत्कर्षा मुख्यसुलभक सुजाता कुडतरकर यांनी मुलींना आणि माता पालकांना तपशीलवार माहिती सांगितली. दरमहा एक वर्ग होणार असल्याबाबत वेळापत्रक सांगितले. सीमा वरुणकर यांनी उत्कर्षा वर्गातील व्हेंडिंग मशीनबाबत माहिती दिली. चेंजिंग रुम व व्हेंडिंग मशीन रुम बद्दल मुलींना अधिक माहिती देऊन अवगत केले. 

          ग्रामपंचायत सदस्या स्मिता टक्के यांनी शासकीय उपक्रमाचे कौतुक करुन सर्वांचे आभार मानले.

Thursday, July 20, 2023

🛑 मा.मयूर रसिकलाल शेठ आणि मा. उज्ज्वला मयूर शेठ यांच्या सौजन्याने शिडवणे नं.१ व शिडवणे कोनेवाडी शाळेच्या ५ वी ते ७ वीच्या सर्व मुलांना कंपासपेट्यांचे वितरण संपन्न

🔹शिडवणे : दिनांक १७ जुलै २०२३ : 

          दरवर्षी शिडवणे नं. १ व शिडवणे कोनेवाडी शाळेत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वितरण करीत असतात. काहीवेळा वैयक्तिक स्वरुपात देणगीदार वस्तुरुपाने देणग्या देऊन शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लावीत असतात. यावर्षीही शाळेत तिसऱ्यांदा भव्य दिव्य स्वरुपात मोफत शैक्षणिक वस्तूंचे समारंभपूर्वक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

          कार्यक्रमाची सुरुवात श्रीदेवी सरस्वती माता आणि श्रीगणेश यांच्यासाठी दिपप्रज्ज्वलन करुन झाली. देवतांचे पूजन , पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणे यांजकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मा. मयूर रसिकलाल शेठ आणि मा. उज्ज्वला मयूर शेठ यांच्या सौजन्याने ५ वी ते ७ वीच्या सर्व मुलांना कंपासपेट्यांचे वितरण करण्यात आले. 

          त्यावेळी सरपंच रविंद्रजी शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ज्येष्ठ शिक्षणप्रेमी बंडू कोकाटे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , मुंबई पोस्ट अधिकारी विलास चौकेकर , शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

          त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे ,  पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई  , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि शाळेतील 51 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.  

          सदर कार्यक्रम उत्तम संपन्न झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ यांनी मा. मयूर रसिकलाल शेठ आणि मा. उज्ज्वला मयूर शेठ व सर्व देणगीदार संस्थांचे विशेष आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

          गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , कार्यवाह , मंगेश शेट्ये , सचिव विजय कुडतरकर , माजी सचिव विलास कुडतरकर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचेही सर्वांनी आभार मानले.

🛑 कै. नारंगीबेन जयंतीलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. नीता वसंत जैनमॅडम , मा. वसंत जयंतीलाल जैनसाहेब यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण संपन्न

🛑 कै. नारंगीबेन जयंतीलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. नीता वसंत जैनमॅडम , मा. वसंत जयंतीलाल जैनसाहेब यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण संपन्न

🔹शिडवणे : दिनांक १७ जुलै २०२३ : 

          दरवर्षी शिडवणे नं. १ शाळेत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वितरण करीत असतात. काहीवेळा वैयक्तिक स्वरुपात देणगीदार वस्तुरुपाने देणग्या देऊन शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लावीत असतात. यावर्षीही शाळेत तिसऱ्यांदा भव्य दिव्य स्वरुपात मोफत शैक्षणिक वस्तूंचे समारंभपूर्वक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

          कार्यक्रमाची सुरुवात श्रीदेवी सरस्वती माता आणि श्रीगणेश यांच्यासाठी दिपप्रज्ज्वलन करुन झाली. देवतांचे पूजन , पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणे यांजकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कै. नारंगीबेन जयंतीलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नीता वसंत जैन , वसंत जयंतीलाल जैन यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ व शिडवणे कोनेवाडी शाळेतील सर्व मुलांमुलींना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. 

          त्यावेळी सरपंच रविंद्रजी शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ज्येष्ठ शिक्षणप्रेमी बंडू कोकाटे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , मुंबई पोस्ट अधिकारी विलास चौकेकर , शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

          त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे ,  पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई  , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि शाळेतील 51 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.  

          सदर कार्यक्रम उत्तम संपन्न झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ यांनी मा. नीता वसंत जैन , मा. वसंत जयंतीलाल जैन यांचे विशेष आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , कार्यवाह , मंगेश शेट्ये , सचिव विजय कुडतरकर , माजी सचिव विलास कुडतरकर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचेही सर्वांनी आभार मानले.

Tuesday, July 18, 2023

🛑 गावठणवाडी उत्कर्ष मंडळ , शिडवणे यांच्या वतीने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण संपन्न

 🛑 गावठणवाडी उत्कर्ष मंडळ , शिडवणे यांच्या वतीने शिडवणे नं. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण संपन्न 

🔹शिडवणे : दिनांक १७ जुलै २०२३ : 

          दरवर्षी शिडवणे नं. १ शाळेत विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक वस्तूंचे वितरण करीत असतात. काहीवेळा वैयक्तिक स्वरुपात देणगीदार वस्तुरुपाने देणग्या देऊन शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार लावीत असतात. यावर्षीही शाळेत तिसऱ्यांदा भव्य दिव्य स्वरुपात मोफत शैक्षणिक वस्तूंचे समारंभपूर्वक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

          कार्यक्रमाची सुरुवात श्रीदेवी सरस्वती माता आणि श्रीगणेश यांच्यासाठी दिपप्रज्ज्वलन करुन झाली. देवतांचे पूजन , पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणे यांजकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कै. नारंगीबेन जयंतीलाल जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नीता वसंत जैन , वसंत जयंतीलाल जैन यांच्या सौजन्याने शिडवणे नं. १ व शिडवणे कोनेवाडी शाळेतील सर्व मुलांमुलींना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. तसेच मयूर रसिकलाल शेठ आणि उज्ज्वला मयूर शेठ यांच्या सौजन्याने ५ वी ते ७ वीच्या सर्व मुलांना कंपासपेट्यांचे वितरण करण्यात आले. 

          त्यावेळी सरपंच रविंद्रजी शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ज्येष्ठ शिक्षणप्रेमी बंडू कोकाटे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , मुंबई पोस्ट अधिकारी विलास चौकेकर , शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

          त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे ,  पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई  , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि शाळेतील 51 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.  

          सदर कार्यक्रम उत्तम संपन्न झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ यांनी सर्व देणगीदार संस्थांचे विशेष आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गावठणवाडी उत्कर्ष मंडळ शिडवणेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटये , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , कार्यवाह मंगेश शेट्ये , सचिव विजय कुडतरकर , माजी सचिव विलास कुडतरकर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचेही सर्वांनी आभार मानले.

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...