Sunday, July 23, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेत उत्कर्षा कार्यशाळा संपन्न

🛑 शिडवणे नं.१ शाळेत उत्कर्षा कार्यशाळा संपन्न 

🔹 किशोरवयीन मुली व त्यांच्या माता पालकांना विशेष मार्गदर्शन

🔸 चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यांवर करण्यात आले मार्गदर्शन

शिडवणे : 

          उत्कर्षा उपक्रमांतर्गत शाळांमध्ये किशोरवयीन मुलींना व माता पालकांना ' मासिक पाळी व्यवस्थापन ' विषयक कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. शिडवणे नं.१ शाळेत या उपक्रमाची जुलै महातील पहिली कार्यशाळा संपन्न झाली. 

          त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा समिता सुतार , ग्रामपंचायत सदस्या स्मिता टक्के आणि बहुसंख्य माता पालक उपस्थित होते. 

          मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुख्याध्यापक यांनी चांगला स्पर्श , वाईट स्पर्श या विषयावर उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. तसेच उत्कर्षा मुख्यसुलभक सुजाता कुडतरकर यांनी मुलींना आणि माता पालकांना तपशीलवार माहिती सांगितली. दरमहा एक वर्ग होणार असल्याबाबत वेळापत्रक सांगितले. सीमा वरुणकर यांनी उत्कर्षा वर्गातील व्हेंडिंग मशीनबाबत माहिती दिली. चेंजिंग रुम व व्हेंडिंग मशीन रुम बद्दल मुलींना अधिक माहिती देऊन अवगत केले. 

          ग्रामपंचायत सदस्या स्मिता टक्के यांनी शासकीय उपक्रमाचे कौतुक करुन सर्वांचे आभार मानले.




No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...