Monday, July 3, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेने मला मोठे केले : सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे

 🛑 शिडवणे नं.१ शाळेने मला मोठे केले : सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे

🔹 शिडवणे नं.१ शाळेत ' गुरुवंदना ' कार्यक्रम संपन्न

🔸शिडवणे : 

           " मुलांनो , तुमचे अनेक गुरु आहेत. या सर्वांचा नेहमी आदर करा. गुरुंनी दिलेल्या योग्य मार्गाने वाटचाल करा. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी , आई वडिलांनी , थोरांनी दिलेला ज्ञानरुपी वसा पुढे चालवा.  गुरु आपल्याला नेहमीच सत्याचा मार्ग दाखवतो हे लक्षात ठेवा. शिडवणे नं.१ शाळेने मला मोठे केले. तुम्हीही मोठे व्हा. " असे मौलिक प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी शिडवणे नं.१ शाळेच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रम प्रसंगी काढले.

          दरवर्षीप्रमाणे शिडवणे नं. १ शाळेत वर्ग व शाळास्तरावर गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. शालेय परिपाठाचा व सहशालेय उपक्रमाचा भाग म्हणून शाळेने याहीवर्षी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

          त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा समिता सुतार , मुख्याध्यापक प्रवीण कुबल , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर यांनीही आपले विचार मांडले. 

          विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल आदरपूर्वक भावना व्यक्त केल्या. शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व समीर कुडतरकर व गणवंती गणेश पाष्टे यांनी सर्व शिक्षकवृंदाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

          अथर्व कुडतरकर , वेदांत कुडतरकर , सुशांत गुंडये , श्रावणी पाष्टे , वेदिका रांबाडे , शुभ्रा पांचाळ , धनश्री सुतार , केतन सुतार , दुर्वा सुतार , गणवंती पाष्टे , फरीन शेख ,  वेदांत रांबाडे , श्रेया पाळेकर , तनिष्का पाटणकर , शफा शेख इत्यादी मुलांनी गुरुवंदना दिली. प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले.




































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...