🛑 पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्यावतीने शिडवणे नं.१ शाळेतील 51 मुलांना वह्या वितरण संपन्न
शिडवणे : 17 जुलै
शिडवणे नं.१ शाळेतील 51 मुलांना सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या सौजन्याने वह्यांचे समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
त्यावेळी सरपंच रविंद्रजी शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , ज्येष्ठ शिक्षणप्रेमी बंडू कोकाटे , सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , मुंबई पोस्ट अधिकारी विलास चौकेकर , शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे , पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि शाळेतील 51 विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. सदर कार्यक्रम उत्तम संपन्न झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ यांनी पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण ( देणगीदार ) यांचे विशेष आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




No comments:
Post a Comment