🛑 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या वतीने शिडवणे नं. १ शाळेत मोफत वह्यांचे वितरण
🔹 संस्थापक निलेश सांबरेसाहेब यांचे शाळेला शैक्षणिक लेखन साहित्य प्रदान
▪️शिडवणे :
दरवर्षी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था शिडवणे नं.१ शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरली आहे. यावर्षी मा. निलेश सांबरे यांच्या आर्थिक सहाय्यातून शिडवणे नं.१ शाळेतील 51 मुलांना एकूण 286 लॉंगबुक वह्यांचा वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक संपन्न झाला.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे , पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि शाळेतील 51 विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.





No comments:
Post a Comment