Saturday, March 14, 2020
Thursday, March 5, 2020
शिडवणे नं.१ शाळेत ८ मार्चला जागतिक महिला दिन संपन्न होणार
शिडवणे नं. १ शाळा परिसरातील सर्व महिला पालक , माता भगिनी, युवती यांना.......स.न.वि.वि. रविवार दि. ८ मार्च रोजी ' जागतिक महिला दिन ' साजरा केला जाणार आहे. रविवार २ वाजता महिला मेळावा संपन्न होईल. सदर कार्यक्रमाला गावातील अधिकाधिक महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे. या मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत शिडवणे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये महिलांना मार्गदर्शन , महिलांसाठी स्पर्धा घेण्यात येतील. संगीत खुर्ची , बादलीत चेंडू टाकणे आणि एका काडीने जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटवणे असे गमतीदार खेळ होतील....तसेच रांगोळी स्पर्धा होणार आहेत....तरी सर्व महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत शिडवणे यांनी केले आहे. रयशस्वी होणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.....मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना चहा व अल्पोपहाराची सोय केलेली आहे....या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शाळेच्या शिक्षिका :सीमा वरुणकर आणि सुजाता कुडतरकर यांच्यामार्फत शाळेतील मुलांकडे आपल्या उपस्थितीसाठी आग्रहपूर्वक विनंती केली आहे.....धन्यवाद ....द्वारा.....शाळा शिडवणे नं. १
Subscribe to:
Posts (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🔴 शिडवणे नं. १ शाळेत कणकवली BRC कडून दिव्यांग सर्व्हे संपन्न; पिळणकर मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!
🔴 शिडवणे नं. १ शाळेत कणकवली BRC कडून दिव्यांग सर्व्हे संपन्न; पिळणकर मॅडम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन! कणकवली: शिक्षण व...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत वारगाव हायस्कूलच्या मान्यवरांची सदिच्छा भेट; २८ जानेवारीला रंगणार बुद्धिबळाचा डाव! शिडवणे: विद्यार्थ्यांच्या कलाग...
-
🔴 जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये ‘बालिका दिन’ व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी🔴 जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये ‘बालिका दिन’ व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी शिडवणे (प्रतिनिधी): क्रांतीज्योती...
-
चिखलात उतरली बालचमू! शिडवणे नं. १ शाळेची 'बांधावरची शाळा' पांडुरंग सुतार यांच्या शेतात उत्साहात संपन्न ▶ 'एक दिवस बळीराजासाठी...


































