Thursday, March 5, 2020

शिडवणे नं.१ शाळेत ८ मार्चला जागतिक महिला दिन संपन्न होणार

शिडवणे नं. १ शाळा परिसरातील सर्व महिला पालक , माता भगिनी, युवती यांना.......स.न.वि.वि.                   रविवार दि. ८ मार्च रोजी ' जागतिक महिला दिन ' साजरा केला जाणार आहे. रविवार २ वाजता महिला मेळावा संपन्न होईल. सदर कार्यक्रमाला गावातील अधिकाधिक महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे. या मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत शिडवणे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. यामध्ये महिलांना मार्गदर्शन , महिलांसाठी स्पर्धा घेण्यात येतील. संगीत खुर्ची , बादलीत चेंडू टाकणे आणि एका काडीने जास्तीत जास्त मेणबत्त्या पेटवणे असे गमतीदार खेळ होतील....तसेच रांगोळी स्पर्धा होणार आहेत....तरी सर्व महिलांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत शिडवणे यांनी केले आहे. रयशस्वी होणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे.....मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व महिलांना चहा व अल्पोपहाराची सोय केलेली आहे....या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी शाळेच्या शिक्षिका :सीमा वरुणकर आणि सुजाता कुडतरकर यांच्यामार्फत शाळेतील मुलांकडे आपल्या उपस्थितीसाठी आग्रहपूर्वक विनंती केली आहे.....धन्यवाद ....द्वारा.....शाळा शिडवणे नं. १

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...