Monday, September 30, 2024

नवीन शालेय समित्या : शिडवणे नं. १

 




🛑 ' स्वच्छता हिच सेवा ' निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होणार

 🛑 ' स्वच्छता हिच सेवा ' निबंध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होणार

 🔸 ग्रामपंचायत शिडवणे यांजकडून यशस्वी विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण संपन्न होणार

शिडवणे : 

          दरवर्षी ग्रामपंचायत शिडवणे यांचेमार्फत स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे समारंभपूर्वक बक्षिसे देऊन कौतुक करुन प्रेरणा देण्यात येते. 

          यावर्षीही ' स्वच्छता दिवस ' म्हणजेच महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी शिडवणे नं. 1 शाळेतील लहान गटात यशस्वी झालेल्या शुभ्रा सुनिल पांचाळ, साक्षी श्रीराम पाष्टे व श्रेयांश सुनिल पांचाळ तसेच मोठ्या गटात फरान तारीफ शेख, फरीन तारीफ शेख व सार्थक महेंद्र धुमाळ यांचे ग्रामपंचायत शिडवणे यांच्या वतीने कौतुक करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत शिडवणे यांचेमार्फत मुलांचा कौतुक सोहळा संपन्न होणार असल्याने स्पर्धेत नेहमीच भाग घेणाऱ्या मुलांना अधिकाधिक प्रेरणा मिळत आहे. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल आणि सर्व शिक्षकवृंद यांनी ग्रामपंचायत शिडवणे यांचे आभार मानले आहेत.

©️ मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

तणनाशक औषधाची फवारणी करताना

 🛑 स्वच्छता हिच सेवा : माजी अध्यक्ष मा. दिनेशजी रांबाडे साहेब यांनी शिडवणे नं. 1 शाळेसाठी दिले चार तासांचे योगदान

          आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी शाळा सुरु होण्यापूर्वी सकाळी 9.30 वाजल्यापासून दुपारनंतर 1.30 वाजेपर्यंत सुमारे चार तास सलग उन्हाची पर्वा न करता भर उन्हात शाळेच्या क्रिडांगण आणि सर्व शालेय परिसरातील वाढलेल्या तणावर स्वखर्चाने तणनाशक आणून स्वतः दिनेशजी रांबाडे आणि योगेशजी शिंदे यांनी मिळून तणनाशक फवारणी केली. खरंच त्यांनी केलेल्या या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करीत आहोत. 

🔸 मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1






🛑 मा. संदीकर / जोशी मॅडम यांजकडून शिडवणे नं. 1 शाळेला ' संविधान प्रतिमा ' सप्रेम भेट

🛑 मा. संदीकर / जोशी मॅडम यांजकडून शिडवणे नं. 1 शाळेला ' संविधान प्रतिमा ' सप्रेम भेट

          आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी वारगाव हायस्कुल मध्ये नियत वयोमानानुसार मा. संदीकर / जोशी मॅडम ( वारगाव हायस्कुलच्या इंग्रजी शिक्षिका ) यांचा सेवानिवृत्तीपर शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

          त्यावेळी शिडवणे नं. 1 शाळेच्या वतीने त्यांना ' ग्रंथभेट व गुलाबपुष्प ' देण्यात आले. कार्यक्रमाला आमच्या शाळेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मा. सुप्रिया पाष्टे मॅडम ( ग्रामपंचायत सदस्या ), शिडवणे गावचे पोलिसपाटील मा. समीरजी कुडतरकर साहेब आणि संस्थेचे मान्यवर उपस्थित होते. 

          सौ. संदीकर मॅडम यांनी शिडवणे नं. 1 शाळेला ' भारतीय संविधानाची प्रतिमा ' समारंभपूर्वक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्याकडे प्रदान केली. 

          शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आणि ग्रामपंचायत शिडवणे यांच्या वतीने सौ. संदीकर मॅडम यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत असून त्यांनी शाळेला दिलेल्या भेटीबद्दल आभार मानण्यात येत आहेत. 

©️ मुख्याध्यापक, शिडवणे नं. १




सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...