Thursday, September 5, 2024

शिडवणे नं. १ शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक दिन साजरा

🛑 शिडवणे नं. १ शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक दिन साजरा

आज गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी शिडवणे नं. १ शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षक दिन अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. 

त्यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष समिता सुतार मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपशिक्षिका सीमा वरुणकर आणि उपशिक्षक  दिपक काळेल आणि शाळेतील सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

सर्वप्रथम भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना गुलाबपुष्प अर्पण करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून ' विद्यार्थी शिक्षक दिन ' साजरा करण्यात आला. एक दिवसासाठी सहावी आणि सातवीच्या मुलांनी संपूर्ण दिवस अतिशय नियोजनपूर्वक शाळा चालवली. 

आजच्या दिवसाचे मुख्याध्यापक म्हणून मुख्यमंत्री केतन सुतार, उपमुख्याध्यापिका म्हणून श्रेया पाळेकर आणि पर्यवेक्षक म्हणून सार्थक महेंद्र धुमाळ यांनी शालेय कामकाज पाहिले. 

सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि दिपक काळेल यांनी मुलांना शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना उदाहरणं दिली. डॉ. राधाकृष्णन यांच्याबद्दल अधिक माहिती सांगितली. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक, मनोगत व्यक्त केले व सूत्रसंचालन केले. 

शाळेतील सर्व शिक्षकांचे व आजच्या नव्या शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या. शफा नदीम शेख, जोया शब्बीर शेख, श्रावणी रघुनाथ भोवड, अनुष्का गंगाराम जाधव, तनिष्का प्रवीण पाटणकर , स्वराज योगेश शिंदे, मयुरेश रामचंद्र पाटणकर, ऋषभ अनिल गुंडये, सुशांत संतोष गुंडये , हर्षद दिनेश रांबाडे या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाचे शालेय अध्यापन केले. 

 सायंकाळी चार वाजता पुन्हा सन्मान सभा घेण्यात आली. त्यावेळी शिक्षक झालेल्या सर्व मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिकवताना खूप मज्जा आली असे सर्व शिक्षकांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. 


























































 सीमा संजय वरुणकर मॅडम मनोगत व्यक्त करीत आहेत. 



No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...