Tuesday, September 3, 2024

शिक्षक दिन : विद्यार्थी शिक्षक दिन म्हणून साजरा होणार

दर दिवशी शाळेमध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी म्हणून येत असतात. कारण ते विद्यार्थी असतात. पण एक दिवस असा असतो की हेच विद्यार्थी शिक्षक बनतात. दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. 

हाच शिक्षक दिन वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला तर मुलांना शिक्षकांविषयी अधिक आदर निर्माण होऊ शकतो. दर दिवशी शिक्षक येऊन शिकवतात हे त्यांना माहीतच असते. पण आजच्या दिवशी आम्ही स्वतः विद्यार्थी असूनही शिक्षक बनणार आहोत ही त्यांच्यासाठी खूपच वेगळी गोष्ट असते. एक दिवस शिक्षक बनायला मिळणार यासाठी काही मुले वर्षभर वाट पाहत असतात. 

 म्हणून आणि म्हणूनच आमच्या शिडवणे नं. १ शाळेमध्ये पाच सप्टेंबर 2024 रोजी गुरुवारी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थी शिक्षक दिन साजरा होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी केले आहे. 

©️ मुख्याध्यापक शिडवणे नं. १

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...