आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग भारत स्काऊट गाईड कार्यालयात तज्ञ मार्गदर्शकांची स्काऊट गाईडची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
जिल्हा संघटक अंजली माहुरे मॅडम यांनी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. मास्टर ट्रेनर बागवे मॅडम यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गणेश चतुर्थी नंतर होणाऱ्या स्काऊट , गाईड , कब आणि बुलबुलच्या एक दिवसीय तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले. त्यावेळी स्काऊट गाईड कार्यालयातील विविध फोटो आवश्यक असल्याने काढले. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एवढी माहिती जरी असली तरी आपण आपले शाळेचे पथक नक्कीच सुरू ठेवू शकतो व दिलेले उपक्रम पूर्ण करू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्हा स्काऊट कार्यालयाकडून सर्व शिक्षकांकडून करण्यात आलेली अपेक्षा सर्व शिक्षक नक्कीच पूर्ण करतील अशी आशा वाटते.
©️ स्काऊट मास्टर व कब मास्टर : प्रवीण कुबलसर



















No comments:
Post a Comment