Saturday, July 30, 2022

🛑 सीमा वरुणकर यांना उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार

🛑 सीमा वरुणकर यांना उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार

शिडवणे : 

          नुकतीच शिडवणे नं.१ शाळेची शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभा संपन्न झाली. त्यावेळी दिनेश रांबाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. 

          शालेय पोषण आहार संदर्भात चर्चा व विचार विनिमय करण्यात आला. समिता सुतार आणि सुरेश सुतार यांची स्वयंपाकी व मदतनीस म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. 

         मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी' हर घर तिरंगा ' उपक्रमाची माहिती दिली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत शेर्पे केंद्रस्तरीय स्पर्धेत सहभागी व विजेत्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन समारंभपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यात शफा नदीम शेख , फरीन तारीफ शेख , अथर्व समीर कुडतरकर , सेजल एकनाथ भोवड , लवेश पांडुरंग कासार्डेकर , नितेश रामचंद्र पाटणकर , श्रेया राजेश पाळेकर , तनिष्का प्रवीण पाटणकर यांचा प्रामुख्याने समावेश होता. 

          गेली तीन वर्षे सलग उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार मिळवणाऱ्या उपशिक्षिका सीमा वरुणकर यांनी यावर्षीही पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

          त्यावेळी सभागृहात योगेश शिंदे , तारीफ शेख , मंजुळा गुंडये , समिता सुतार , प्रेरणा कासार्डेकर , अस्मिता भोवड आणि बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते.





















Wednesday, July 13, 2022

🛑 मुलांनो , आपल्या गुरुंचा सदैव सन्मान करा : केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल

 🛑 मुलांनो , आपल्या गुरुंचा सदैव सन्मान करा : केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल

🟢 शिडवणे नं. १ शाळेचा गुरुपौर्णिमा उपक्रम संपन्न

शिडवणे : 

          दरवर्षी शाळांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. यावर्षी शिडवणे नं. १ शाळेने गुरुपौर्णिमा उपक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केले. त्यानिमित्ताने शाळेतील मुलांनी आपल्या गुरुंना ' गुरुवंदना ' दिली. 

          त्यावेळी शेर्पे खारेपाटण केंद्रांचे केंद्रप्रमुख सदगुरु कुबल यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आले. 

          सद्गुरू कुबल म्हणाले , " मुलांनो , नेहमी आपल्या गुरुंचा आदर सन्मान करा. त्यांनी दिलेली अनमोल शिकवण आचरणात आणा. दिलेला अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करा. " त्यांनी मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले व खाऊ दिला. 

          अथर्व कुडतरकर , वेदांत कुडतरकर , नितेश पाटणकर , फरान शेख , शफा शेख , फरीन शेख , श्रेया पाळेकर या मुलांनी आपल्या भाषणातून शिक्षकांबद्दल आदर व्यक्त केला. उपस्थित सर्व मुलांनी केंद्रप्रमुख सदगुरू कुबल व गुरुजनांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन साष्टांग नमस्कार केला. 

          पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व मुले , अंगणवाडीतील मुले , मदतनीस केतकर इत्यादी उपस्थित होते.



































सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...