🔴 जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये ‘बालिका दिन’ व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
शिडवणे (प्रतिनिधी):
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ येथे 'बालिका दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या गौरवार्थ आयोजित या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
याप्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका वेदिका चव्हाण, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी, उपशिक्षक सुरेंद्र यादव, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, अंगणवाडी मदतनीस कविता केतकर आणि शालेय पोषण आहार मदतनीस समिता सुतार उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या मुलींनी साकारलेली सावित्रीबाईंची वेशभूषा. शुभ्रा सुनील पांचाळ, धनश्री सुरेश सुतार आणि आर्वी अमोल येतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत येऊन अतिशय प्रभावी सादरीकरण केले. तसेच मैथिली टक्के, साक्षी पाष्टे, वेदिका रांबाडे, स्वराज शिंदे आणि वेदांत रांबाडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या संघर्षमयी जीवनावर आपले विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली.
मार्गदर्शन व कौतुक
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुरेंद्र यादव यांनी केले. उपमुख्याध्यापिका वेदिका चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
या सोहळ्यामुळे शाळेतील वातावरण भारावून गेले होते. विद्यार्थिनींच्या शिक्षणाप्रती जागरूकतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










No comments:
Post a Comment