शिडवणे शाळेला माऊली वारकरी संप्रदायाकडून 'दिंडीभजन' दिनदर्शिकांची भेट; कुबल गुरुजींनी मानले आभार
शिडवणे:
येथील माऊली वारकरी संप्रदाय, शिडवणे यांच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत, जिल्हा परिषद शाळा शिडवणे नं. १ ला सन २०२६ सालच्या 'दिंडीभजन' दिनदर्शिका भेट देण्यात आल्या. संप्रदायाचे वतीने एकूण ११ कॅलेंडर शाळेचे मुख्याध्यापक कुबल गुरुजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापक कुबल गुरुजी यांनी माऊली वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष मा. श्री. परशुराम पाष्टे, उपाध्यक्ष मा. श्री. जयराम गिरकर, कार्याध्यक्ष मा. श्री. महेंद्र टक्के आणि उपस्थित सर्व संप्रदाय मंडळींचे विशेष आभार मानले. संप्रदायाने यापूर्वीही शाळेला वेळोवेळी विविध स्वरूपाची मदत केली असून, शालेय प्रगतीत त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेतील प्रत्येक वर्गखोलीत या दिनदर्शिका लावण्यात येणार आहेत. या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती शिडवणे नं. १ व शिक्षकवृंद यांच्या वतीने संप्रदायाचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.





No comments:
Post a Comment