Saturday, August 26, 2023
विद्यार्थी , शिक्षक आणि पालक यांच्यासाठी वर्तमानपत्र वाचन कट्टा
आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी शिडवणे नं.१ शाळेत विद्यार्थी , शिक्षक आणि पालक यांच्यासाठी वर्तमानपत्र वाचन कट्टा सुरु करीत आहोत. वर्तमानपत्र वाचनाची सवय मुलांना लागावी. जगातील चालू घडामोडी मुलांना समजाव्यात. ठळक बातम्यांचे त्यांनी वाचन करावे. अपरिचित आणि नवीन गोष्टींना समजून घ्यावे. स्पर्धा परीक्षेला उपयुक्त प्रश्नांची उत्तरे , प्रश्न यांचा संग्रह करावा असे अनेक हेतु साध्य करण्याच्या दृष्टीने हा ' वाचन कट्टा ' सुरु केला आहे.
शाळेत येणाऱ्या अभ्यागतांना वाचनासाठी पेपर उपलब्ध व्हावा असाही उद्देश आहे. शिक्षकांना संदर्भ साहित्य मिळावे , परिपाठ यासाठीही वर्तमानपत्राचा पूरक उपयोग होणार आहे.
चांगल्या शैक्षणिक बातम्यांचा संग्रह करता येऊ शकतो. स्कॉलर या सारख्या नवीन सदरांचा उपयोग मुले आवश्यकतेनुसार करु शकतात. शिक्षकांनी मात्र मुलांना योग्य तिथे मार्गदर्शन करीत राहायला हवे.
विविध प्रकल्प करत असताना वर्तमानपत्रातील विविध माहिती , चित्रे यांचे संकलन करावे लागते. मुलांनी यासाठीही या उपक्रमाचा उपयोग करावा असे अपेक्षिलेले आहे.
वाचनाची आवड जोपासत असताना ज्ञानसंपन्न व्हावे , स्पर्धा परीक्षेला आवश्यक असलेली माहिती वाचून मुद्दे काढावे हे शिक्षकांनी एकदा दोनदा दाखवले तरी मुले नक्की करु शकतील असा विश्वास वाटतो.
⭕ मुख्याध्यापक , शिडवणे नं.१
Friday, August 18, 2023
मयुरेश पाटणकरचा वाढदिवस
🎂 Happy Birthday , Mayuresh
आज आमच्या शाळेतील सहावीत शिकणाऱ्या मयुरेश रामचंद्र पाटणकर याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी त्याचे औक्षण करण्यात आले. केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याने शाळेला ' सोनचाफ्याचे ' झाड भेट म्हणून दिले. त्यावेळी मुलांनी अतिशय आनंद व्यक्त केला.
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...



























































