Tuesday, August 1, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेत वक्तृत्व स्पर्धा

🛑 शिडवणे नं.१ शाळेत वक्तृत्व स्पर्धा

🔹 लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य

शिडवणे : 

          शाळांमध्ये विविध नेत्यांच्या जयंत्या , पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. बालवयात प्राथमिक स्तरावर मुलांवर वक्तृत्वाचे संस्कार रुजण्यास सुरुवात होत असते. या उपक्रमाचे औचित्य साधून शिडवणे नं.१ शाळेतील ३९ मुलांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित उत्तम भाषणे सादर केली. 

          शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा समिता सुतार , शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री अथर्व समीर कुडतरकर , उपमुख्यमंत्री दुर्वा संतोष सुतार यांच्या शुभहस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

          त्यावेळी बालगटामध्ये गार्गी चेतन नावळे ( प्रथम ) , राहुल शिवाजी वारिसे ( द्वितीय ) ; मध्यम गटामध्ये धनश्री सुरेश सुतार ( प्रथम ) , शुभ्रा सुनिल पांचाळ ( द्वितीय ) ; मोठ्या गटामध्ये केतन सुरेश सुतार ( प्रथम ) , श्रेया राजेश पाळेकर ( द्वितीय ) या क्रमांकाचे यश प्राप्त केले. मान्यवरांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 

          सर्वांनी अतिशय अभ्यासपूर्वक भाषण केले. शाळेतील उपशिक्षिका सुजाता प्रल्हाद कुडतरकर आणि सीमा संजय वरुणकर यांनी स्पर्धेचे परिक्षण व मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. शालेय मुख्यमंत्री अथर्व कुडतरकर यांनी सर्वांचे आभार मानले.





































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...