Tuesday, August 15, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेत वृक्षारोपण संपन्न

🛑 शिडवणे नं.१ शाळेत वृक्षारोपण संपन्न

🔹 कृषी महाविद्यालय सांगुळवाडीतील कृषीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम

▪️शिडवणे : 

          शिडवणे नं.१ शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला. त्यावेळी ग्रामपंचायत शिडवणे , शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , ग्रामस्थ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. 

          ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत प्रणव देशमुख , अभिषेक वाघ , ओंकार पवार , अजिंक्य देवकर , रोहित वारे , साईगणेश मोरे , साईकृष्ण जक्कुला , कार्तिक मैदाम , सुयोग झांबरे आणि शिवराज लाड या शिडवणे केंद्राच्या विद्यार्थी समूहाने मान्यवरांच्या उपस्थितीत 10 शोभेच्या झाडांची लागवड करीत वृक्षारोपण केले. 

          त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी आभार मानले आहेत. सर्व पदाधिकारी यांनी वृक्षारोपण करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल 10 युवकांचे तोंड भरुन कौतुक केले आहे.












No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...