🛑 गुरुदास विजय टक्के यांजकडून शिडवणे नं.१ शाळेला ग्रंथभेट
🔹 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य
▪️शिडवणे :
शिडवणे नं.१ शाळेतील सर्व मुलांना , शिक्षकांना आणि पालकांना देशभक्तीपर माहिती देणाऱ्या 25 निवडक पुस्तकांचे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक वितरण करण्यात आले.
शिडवणे गावातील मुंबईस्थित वकिली व्यवसाय करणारे गुरुदास विजय टक्के यांनी शालेय ग्रंथालयासाठी अनमोल अशा ग्रंथांची भेट दिली. त्याबद्दल सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी , शाळा व्यवस्थापन , शिक्षक पालक , माता पालक सर्व समिती पदाधिकारी यांनी गुरुदास टक्के यांचे विशेष आभार मानले आहेत. मुलांसाठी त्यांनी खाऊसुद्धा पाठवून दिला होता.






No comments:
Post a Comment