Thursday, September 14, 2023

🛑 शिडवणे नं.१ शाळेत आजी आजोबा दिवस अत्यंत उत्साहात संपन्न

🛑 शिडवणे नं.१ शाळेत आजी आजोबा दिवस अत्यंत उत्साहात संपन्न

🎅 शिडवणे नं.१ शाळेत आजी आजोबा दिवस अतिशय उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला 30 पेक्षा जास्त आजी , आजोबा , पदाधिकारी उपस्थित होते. तसेच शाळेतील 50 विद्यार्थी , 3 शिक्षक उपस्थित होते.

▪️आजी आजोबांच्या आगमनाच्या वेळी मुलांनी वाद्ये वाजवून स्वागत केले.

▪️आजी आजोबांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन शुभारंभ झाला.

▪️सर्व उपस्थित मान्यवरांचे व आजी आजोबांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले.

▪️मुख्याध्यापक प्रवीण कुबलसर यांनी प्रास्ताविक केले.

▪️मुलांनी आजी आजोबांच्या पायांना पाणी लावून पुसून घेतले व पायांवर डोके ठेवून प्रणिपात केला.

▪️उपस्थित आजी आजोबांनी गायन केले. फुगड्या नर्तन केले. 

▪️केतन सुतार आणि धनश्री सुतार यांनी आजी आजोबांसाठी पुस्तकाबाहेरील कविता सादर केली. कविता ऐकताना आजी आजोबांच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या दिसल्या.

▪️अथर्व कुडतरकर आणि श्रेया पाळेकर या दोन मुलांनी अतिशय हृदय असे मनोगत व्यक्त केले. आजी आजोबांनी आणि मान्यवरांनी दोघांच्या मनोगताला टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

▪️सुजाता कुडतरकर मॅडम यांनी आजीबाईंचा बटवा दाखवला. त्यातील अनेक औषधी गुण तत्त्वे सांगितली. आजी आजोबांनीही त्यांना योग्य प्रतिसाद दिला.

▪️ग्रामविकास अधिकारी मा. बी.एस. कोकाटेसाहेब यांनी आजी आजोबांच्या संस्कारांचे महत्त्व विशद केले व शासनाच्या उपक्रमाची प्रशंशा केली.

▪️माजी वित्त व बांधकाम समिती सभापती मा. रविंद्रजी जठारसाहेब यांनी आजी आजोबांना धन्यवाद दिले. मुलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. 

▪️सदर कार्यक्रमाला 7 आजोबा आणि 15 आजी उपस्थित होत्या. शिडवणे गावचे सरपंच मा. रविंद्रजी शेट्येसाहेब , तंटामुक्ती अध्यक्ष मा. महेंद्र टक्केसाहेब यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला. 

▪️सर्वांना शाळेकडून अल्पोपहार वितरण करण्यात आले. 

▪️आजी आजोबा दिवसानिमित्त पाचवीच्या मुलींनी सुंदर नृत्याचे सादरीकरण केले.

▪️आजी आजोबा दिवसानिमित्त दोन अननसाची झाडे लावण्यात आली. 

▪️सीमा वरुणकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

▪️मुख्याध्यापक प्रवीण कुबलसर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. 























सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...