प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरी एक झाड लावा आणि ते जगवा - ग्रामपंचायत शिडवणे यांचा उपक्रम
शिडवणे : शनिवार दिनांक २७ जुलै २०१९ रोजी ग्रामपंचायत शिडवणे यांच्या सौजन्याने शिडवणे नं.१ शाळेतील सर्व ६६ मुलांना काजूची रोपटी देण्यात आली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनील भागोजी तांबे यांनी सर्व मुलांना झाडे लावण्याचे महत्त्व सांगितले. सर्व मुलांना काजूच्या प्रत्येकी एका रोपट्याचे वितरण करण्यात आले. सर्व मुलांनी आपल्या काजूच्या रोपट्याचे व्यवस्थित रोपण करून त्याची निगा ठेवण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सर्व मुले आपल्याला दिलेले रोपटे घेऊन आनंदात शाळेत आली. ' एक झाड लावू मित्रा , त्याला पाणी घालू ' हे निसर्ग गीत म्हणत त्यांनी आपल्या झाडाबरोबर ' मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू ' असे आश्वासन दिले.
झाडे ही प्रभूची हिरवी मंदिरे आहेत, असे सानेगुरुजींनी सांगितले ते खरे आहे. झाडे आपल्याला फळे, फुले, सावली, लाकूड आणि जीवनावश्यक गोष्टी देतात. पाऊस पडण्यासाठी सुद्धा झाडे असणे गरजेचे असते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व ती जगवणे अत्यंत गरजेचे आहे. तुकारामांनी म्हटले आहे कि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे , पक्षीही सुस्वरें आळविती.
सर्व मुलांनी , शिक्षकवृंदांनी ,मुख्याध्यापक सुनिल तांबे व सर्व समित्यांचे पदाधिकारी यांनी शाळेच्या वतीने शिडवणे ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.