१ जुलै २०१९ रोजी शिडवणे नं .१ शाळेत कृषी दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली ; सांगुळवाडी कृषी महाविद्यालय , सांगुळवाडी व ग्रामपंचायत शिडवणे यांच्या सहकार्यातून ' कृषी दिन ' साजरा करण्यासाठी नियोजनाप्रमाणे कार्यवाही करण्यात आली.
सदर समारंभपूर्वक कार्यक्रमासाठी गावाच्या सरपंच सौ. शीतल जाधव , सदस्य श्री. अनिल पांचाळ, श्री. परशुराम पाष्टे, सौ. शीतल टक्के, सौ. दिपाली पांचाळ, मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबे सर , शिडवणे कोनेवाडी शाळेचे उपशिक्षक श्री. खांबाळकर सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल गाठ यांनी केले. श्री. पृथ्वीराज कोरे यांनी वसंतराव नाईक जयंती व कृषी दिन यांचे महत्त्व स्पष्ट केले. संदेश कांबळे, कासिम एन , वामसे कोपारपू व निखिल राव यांनीही सहकार्य केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबे यांनी मार्गदर्शन केले. सरपंच श्रीम. शीतल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर ' वृक्षदिंडी ' चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यात विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी, पालक व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. माणसा माणसा वेळ काढ , एक तरी झाड लाव ....वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.....माकडा माकडा हूप हूप , झाडे लावू खूप खूप ....एक दोन तीन चार, झाडे देतात सावली गार अशा घोषणा देण्यात आल्या. ' एक झाड लावू मित्रा , त्याला पाणी घालू ...मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू ....असे निसर्ग गीत म्हणत मुलांनी प्रभात फेरी आनंदाने फिरवून आणली. ढोल ताशांच्या गजरात दिंडी पुन्हा शाळेत दाखल झाली.
शाळेत त्यानंतर ' वृक्षारोपण ' कार्यक्रम संपन्न झाला. साग, ऐन, काजू, चिंच अशी फळे व लाकूड देणारी झाडे लावण्यात आली. त्यात अंगणवाडीच्या मुलांनी व बाईनी सहभाग घेतला होता. उत्तम सहकार्याबद्दल सांगुळवाडीच्या विद्यार्थ्यांनी सर्व मुलांना गोड खाऊ वाटला. सर्व शिक्षकांनी त्यांचे आभार मानले.

No comments:
Post a Comment