शिडवणे : शुक्रवार दिनांक २१ जून २०१९ रोजी शिडवणे नं .१ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिनेश रांबाडेसाहेब प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी श्री. प्रवीण कुबल सर यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करवून घेतली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुनिल तांबे सर यांनी अध्यक्षांचे पुष्प देऊन यथोचित स्वागत केले. योगशिक्षक श्री. प्रवीण कुबल सरांनी पतंजलीच्या ' योगेन चित्तस्य पदेन वाचा ' या मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली. मुलांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. शाळेतील शिक्षकवर्ग श्रीम. सीमा वरुणकर, श्रीम. सुजाता कुडतरकर यांनीही सहभाग घेऊन मुलींना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक श्री. सुनील तांबे सर यांनी स्वतः अवघड आसने करून योग्य प्रात्यक्षिके अधिक जिवंत केली. ओंकार मंत्र म्हणत मुलांनी योग्य प्रकारे श्वसनावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. पद्मासन, सिद्धासन, पश्चिमोत्तानासन, फुलपाखरू आसन , त्रिकोणासन , भुजंगासन, हलासन, नौकासन, धनुरासन , सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम, कपालभाती, पूरक, कुंभक, रेचक, वज्रासन, उष्ट्रासन अशी आसने करवून घेऊन मुलांना १ मिनिट आसन टिकवून ठेवण्यात यश मिळवले. शेवटी प्राणायाम व शवासन करून आसनांची सांगता करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सर्वांचे हार्दिक स्वागत
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳
🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...
-
🔹आदरणीय मा. वेदिका चव्हाण मॅडम, आमच्या शिक्षणरूपी मंदिरामध्ये, सरस्वतीच्या या पवित्र प्रांगणात आम्ही आपले मनःपूर्वक आणि उत्साहाने...
-
शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा ! शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम...
-
🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पं...















No comments:
Post a Comment