Wednesday, July 10, 2019

एक दिवस शाळेसाठी : बांधावरची शाळा : शिडवणे नं . १ : १० जुलै २०१९

              एक दिवस शाळेसाठी : बांधावरची शाळा : शिडवणे  नं . १  : १० जुलै २०१९ 

                आज दिनांक १० जुलै २०१९ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे  नं .१ शाळेने ' एक दिवस शाळेसाठी ' अर्थात ' बांधावरची शाळा ' हा उपक्रम संपन्न केला. त्यावेळी श्री. निलेश टक्के यांच्या शेतामध्ये मुलांनी शेतीची प्रात्यक्षिके पाहिली . स्वतः सर्व प्रकारच्या प्रात्यक्षिक कार्यामध्ये सहभागी होण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. शाळेतील सर्व ६५ मुलांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. गावातील व टक्केवाडीतील महिला व शेतकरी ग्रामस्थांनी त्यात प्रामुख्याने सहभाग घेतला होता. पेरणीनंतर लावणी करण्यापूर्वी तरवा  काढण्याचे महत्त्वाचे काम करायचे असते. शेताची मशागत करताना विविध क्रिया करताना त्याचा क्रम योग्य प्रकारे ठेवावा लागतो. पावसात भिजत काम करायला लागते. शेती करण्याची आवड निर्माण करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट यामधून साध्य करणे हे शासनाचे ध्येय आहे. घरी कोणतेही काम न करणाऱ्या शहरातल्या मुलांसाठी हा उपक्रम पर्वणीच ठरत आहे. शिक्षक मुलांना घेऊन शेतात जातात त्यामुळे ग्रामस्थांना, पालकांना शाळेबद्दल ओढ निर्माण होते.
                  गुरांच्या मदतीने, नवीन अत्याधुनिक साधनांचा वापर करत शेती करावी लागते. नवीन संकरित बियाणी खरेदी करून त्याची लागवड करावी लागते. शेतकरी करत असलेले कष्ट पाहून शेतकऱ्यांबद्दल आपुलकी निर्माण होऊन श्रमप्रतिष्ठा वाढीस लागावी हाही एक उद्देश आहे. लावणी करताना ती एक काडी किंवा दोन काडी या प्रकारात गादी वाफ्यामध्ये चिखलमय जमीन नांगरून रांगेत तरवा लावावा लागतो.
                   शाळेतील उपशिक्षिका सौ. सीमा वरुणकरबाई, सौ. सुजाता कुडतरकरबाई यांनी मुलींना लावणी कशी लावावी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.मुलांनी वाफ्याच्या बांधांना चिखल लावून तो बांध मजबूत करण्याचे प्रात्यक्षिक केले. मुख्याध्यापक श्री. सुनिल  तांबेसर यांनी लावणी लावली. श्री. कुबलसर यांनी मुलाखत घेतली. श्री. निलेश टक्के आणि कुटुंबीय यांनी सर्वांना चहा देऊन आमच्या शेतात मुलांना आणल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. मुलांना आजचा शेतावरचा दिवस अत्यंत जिव्हाळ्याचा वाटला. त्याविषयी बोलत बोलत शाळेत कधी आली ते त्यांना समजलेदेखील नाही.






































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...