Monday, June 16, 2025

शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा !

 

शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा !

शिडवणे, १६ जून: आज शिडवणे नं. १ शाळेत 'शाळा प्रवेशोत्सव' कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह इतर वर्गात दाखल झालेल्या एकूण ७ नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नव्यागतांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि मान्यवरांच्या शुभहस्ते 'माझं शाळेतील पहिलं पाऊल' हा खास कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या प्रसंगी नव्या विद्यार्थ्यांच्या हाताचे व पायाचे ठसे घेण्यात आले. तसेच, पदाधिकारी महिलांच्या हस्ते औक्षण करून मुलांचा शाळेत प्रवेश झाला, ज्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शारदा माता व गणेश मूर्तीसमोर दीपप्रज्वलन करून आणि पुष्पहार अर्पण करून झाली. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.

या सोहळ्यात शाळेतील सर्व ४९ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, बूट आणि सॉक्स यांचे वितरण करण्यात आले. देणगीदार रामदास टक्के व ललिता टक्के यांच्या सौजन्याने सर्व मुलांना वह्या, पेन, पेन्सिल आणि चित्रकला वही असे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे, औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे यांच्या सहकार्यानेही विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप झाले. शाळेच्या वतीने औदुंबर सेवा ट्रस्टचे मनोहर नारकर आणि ललिता टक्के यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, शाळेतील गणित शिक्षिका हेमा वंजारी यांनाही सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के यांसारख्या मान्यवरांनी उपस्थिती लावली आणि मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया पाष्टे, संचिता टक्के, मनोहर कोकाटे, पोलीस पाटील समीर कुडतरकर, योगेश सुतार, तारीफ शेख, अन्वी येतकर, मनाली धुमाळ, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, गुरुदास लाडके , नदीम शेख , प्रवीण पाटणकर , अरविंद धाक्रस , मनोहर नारकर , रुपेश कुडतरकर , रवींद्र खांडेकर , प्रफुल्ल घाडी , योगेश शेट्ये , कृष्णा नारकर , संतोष सावंत , अंकित शेट्ये , योगेश घाडी , प्रदिप कुडतरकर , परशुराम इस्वलकर , मंगेश शिंगरे , दिपक पावसकर , विशाल जठार , सागर कदम , रंजरा शिंगरे , सखाराम शिंगरे , विठोबा नारकर , स्नेहा पांचाळ , प्रेरणा कासार्डेकर , रेशमी भोवड , जान्हवी टक्के , मेघना सुतार , सायली सुतार , निशा कुडतरकर , कोमल वारिसे , गायत्री वाघरे , उर्मिला सुतार , समिक्षा सुतार , श्रीराम पाष्टे , सीमा वरुणकर , समिता सुतार , सुरेश सुतार , कविता केतकर , ग्रामस्थ आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते. वारगाव ग्रामपंचायत अधिकारी देवेंद्र नलावडे यांनी शाळेला नियोजित भेट दिली. 

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले. हा 'शाळा प्रवेशोत्सव' विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी सुरुवात ठरला आणि शाळेच्या शैक्षणिक वातावरणात अधिक उत्साह निर्माण करणारा ठरला.



























































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...