🔴 शिडवणे नं. १ शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी; विविध उपक्रमांचे आयोजन
शिडवणे, २६ जून २०२५: आज शिडवणे नंबर १ शाळेत राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात निबंध स्पर्धेसाठी मुलांना आवाहन करण्यात आले असून, सुंदर हस्ताक्षरात महाराजांच्या जीवनावर आधारित निबंध लिहून आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात भगतसिंग स्काऊट पथक आणि राणी लक्ष्मीबाई गाईड कंपनीने केली. मुख्यमंत्री शफा नदीम शेख आणि मुख्यमंत्री स्वराज योगेश शिंदे यांच्या उपस्थितीत शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर उपशिक्षक दिपक काळेल सरांनी शाहू महाराजांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित माहितीपर गोष्टी सांगितल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख सीमा वरुणकर यांनी मुलांना निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.









No comments:
Post a Comment