🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'स्वच्छता मोहीम' उत्साहात साजरी
शिडवणे, (दिनांक २५ सप्टेंबर, २०२५): शिडवणे नं. १ शाळेमध्ये आज 'स्वच्छता पंधरवडा' अंतर्गत स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात राबवण्यात आली. या मोहिमेत शाळा आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी विविध मान्यवर, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच रवींद्र शेट्ये, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रित येऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संचिता टक्के, शिक्षण तज्ज्ञ मनोहर कोकाटे, माजी अध्यक्ष सुप्रिया पाष्टे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया पांचाळ, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, आशा सेविका आरती शिंदे आणि दीपिका शेट्ये, ग्रामपंचायत कर्मचारी गोविंद पाष्टे, अंगणवाडी मदतनीस कविता केतकर, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, आणि पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांची विशेष उपस्थिती होती.
शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या मोहिमेमुळे शाळेचे परिसर स्वच्छ तर झालाच पण त्यासोबतच सामुदायिक भावनेने काम करण्याचा संदेशही देण्यात आला.













No comments:
Post a Comment