🔴 जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
शिडवणे, (प्रतिनिधी) — जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये आज ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शालेय स्वराज्य मंडळाचे मुख्यमंत्री स्वराज योगेश शिंदे, शफा नदीम शेख आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आदरपूर्वक त्यांना अभिवादन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती दिली. त्यांच्या कार्यामुळे आणि योगदानामुळेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले. यानंतर, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या चरित्रावर आधारित एक ऑनलाइन प्रश्नावली शाळेच्या ग्रुपवर पाठवण्यात आली.
याच दिवशी मोहम्मद पैगंबर यांची जयंती असल्याने, त्यांच्याविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिक्षक दिनाच्या या आनंदमय वातावरणात शिक्षकवृंदांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या वेळी बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.








No comments:
Post a Comment