🔴 शिडवणे नं. १ च्या जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेत शारदोत्सव समारंभ व 'शाळा तिथे दाखला' उपक्रम उत्साहात!
शिडवणे: येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये मंगळवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी शारदोत्सव समारंभ आणि समाजोपयोगी 'शाळा तिथे दाखला' या कार्यक्रमांचे अतिशय उत्साही व भक्तीमय वातावरणात आयोजन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता सरस्वती आवाहन आणि पूजन पूर्वतयारीने झाली. ठीक १०.३० वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन, पाटी पूजन आणि आरती संपन्न झाली. पूजनानंतर 'बैसली मयूरावती' ही प्रार्थना आणि सरस्वती वंदना स्तोत्रे घेण्यात आली.
सकाळपासूनच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी ११.०० वाजता विद्यार्थ्यांनी भजने सादर केली, तर मुलींनी व महिलांनी आनंदात फुगड्या खेळल्या. दुपारी १२.०० वाजता आजी-माजी विद्यार्थी/विद्यार्थिनी आणि महिला मंडळाने सामूहिक गरबा नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत शिडवणे पाष्टेवाडी येथील स्थानिक भजन मंडळाच्या स्वेच्छा भजन सेवेने झाली.
शारदोत्सवाच्या औचित्याने आज शाळेत 'शाळा तिथे दाखला' या विशेष उपक्रमाचेही यशस्वी आयोजन करण्यात आले. यातून नागरिकांना महत्त्वपूर्ण असलेले ५८ वय अधिवास आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर, शैक्षणिक मदतीच्या उद्देशाने ४९ विद्यार्थ्यांना दुसरा शालेय गणवेश वितरित करण्यात आला.
शाळा प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शाळेच्या योगदानासाठी उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षणसेविका हेमा वंजारी, उपशिक्षक सुरेंद्र यादव आणि शालेय पोषण आहार स्वयंपाकी समिता सुतार यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण समारंभाला गावचे सरपंच रविंद्र शेट्ये, उपसरपंच दिपक पाटणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त विजय टक्के, उपाध्यक्षा संचिता टक्के, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे, प्रकाश केशव टक्के, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर, सुप्रिया पांचाळ, स्मिता टक्के, माजी अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया पाष्टे, पोलीस पाटील समीर कुडतरकर, आणि पोस्टमास्तर आबा टक्के हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. तसेच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्या गायत्री वाघरे, उर्मिला सुतार, योगेश सुतार, अन्वी येतकर, मनाली धुमाळ, तारीफ शेख, मेघना सुतार, योगिता सुतार, अंकिता गुंडये, अंकिता जाधव, कविता केतकर, प्रियांका पाटणकर, जान्हवी टक्के, समिता सुतार, निता टक्के, निशा कुडतरकर, आणि मानसी रांबाडे, स्नेहा पांचाळ यांसह बहुसंख्य पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी, शिक्षकवृंद व विद्यार्थीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा शारदोत्सव शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकीचा महत्त्वाचा दिवस ठरला.























































































No comments:
Post a Comment