🔴 शिडवणे नं. १ शाळेत महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
कणकवली (जि. सिंधुदुर्ग): गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी कणकवली तालुक्यातील शिडवणे नं. १ शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीनिमित्त शाळेत विशेष बालसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विद्यार्थ्यांनी दोन्ही महान नेत्यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून आणि विचारातून प्रेरणा घेतली.
यावेळी शाळेच्या पदवीधर शिक्षणसेविका हेमा राजाराम वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या आदर्श विचारांचे महत्त्व स्पष्ट करून, विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन केले.
बालसभेला उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदराने नमस्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





No comments:
Post a Comment