🔴 ममतामय सदिच्छा
शिडवणे नं. १ शाळेच्या उपक्रमशील व विद्यार्थिप्रिय शिक्षिका, आदरणीय सौ. सीमा संजय वरुणकर मॅडम यांना सप्रेम निरोप...
मॅडम, शुक्रवारी दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ चा दिवस आमच्यासाठी खूपच जड होता. तुम्ही शिडवणे कोनेवाडी शाळेत बदली झाल्यामुळे कार्यमुक्त झालात, पण तुमच्या कार्यमुक्तीने आमच्या सगळ्यांच्या मनातील एक महत्त्वाचा आणि प्रेमळ भाग रिक्त झाला.
तुमच्या निरोपावेळी सर्व मुले रडू लागली आणि तुम्हालाही तुमचे अश्रू आवरले नाहीत, यावरूनच तुमच्या आणि आमच्या नात्याची खोली स्पष्ट होते. तुम्ही केवळ शिकवले नाहीत, तर प्रेमाने संस्कार केले, प्रत्येक मुलाला समजून घेतले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. तुमचा उपक्रमशील स्वभाव आणि विद्यार्थिप्रियता आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहील.
तुमच्या आठवणी, तुम्ही शिकवलेल्या गोष्टी आणि वर्गातील तुमचे हसणे... हे सर्व आम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही खरंच ग्रेट आहात!
तुम्हाला शिडवणे कोनेवाडी शाळेतील पुढील वाटचालीस आमच्या शिडवणे नं. १ शाळेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमचा हा स्नेहबंध असाच कायम राहील.
धन्यवाद मॅडम!
तुम्ही जिथे जाल, तिथे यशस्वी व्हाल!
👍👍👍
©️ प्रवीण अशितोष कुबल


No comments:
Post a Comment