🧿 लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेतील मुलांना सन्मानचिन्हे प्रदान
शिडवणे :
१ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने शिडवणे नं. १ शाळेने वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यात ३९ मुलांनी सहभाग घेतला होता. यशस्वी प्रथम , द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन मुलांना सन्मानित करण्यात आले.
त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचे समारंभपूर्वक प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले. बालगटात गार्गी चेतन नावळे , राहुल शिवाजी वारिसे ; मध्यमगटात धनश्री सुरेश सुतार , शुभ्रा सुनिल पांचाळ आणि मोठ्या गटात केतन सुरेश सुतार , श्रेया राजेश पाळेकर यांचे मान्यवरांनी शब्दसुमनांनी भरभरुन कौतुक करुन शाबासकी दिली.






No comments:
Post a Comment