🛑 राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. विजय टक्के यांजकडून शिडवणे नं.१ शाळेला 30 पाट्यांचे वितरण
🔹शिडवणे :
मुलांनी पाटीवर भरपूर अभ्यास करावा. शब्द लिहावेत. पाढे लिहावेत , पाठांतर करावेत. या पाट्या गणित , मराठी विषयांसाठी वापराव्यात. चित्रे काढावीत. पर्यावरणपूरक असलेल्या पाट्यांचा वापर हल्ली कमी झाला आहे. मुलांना पाटी म्हणजे काय ते समजायला हवे. पाटीवर लिहिलेले पुसता येते. पाटी पुन्हा पुन्हा वापरता येते. पाटी ही आपली पहिली सरस्वती आहे , तिला वंदन करुन खूप शिका आणि मोठे होऊन नाव कमवा. मी पाटीवर अभ्यास केला आणि मोठा झालो. मला जसे राष्ट्रपतींनी पुरस्कार देऊन सन्मानित केले तसे तुम्हीही सन्मानित व्हायला हवे , असे मौलिक मार्गदर्शन विजय टक्के यांनी वितरण समारंभात मनोगत व्यक्त करताना केले.
मान्यवरांच्या शुभहस्ते पहिली ते चौथीच्या 30 मुलांना 30 पाट्यांचे वितरण समारंभपूर्वक करण्यात आले.
त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , सेवानिवृत्त राष्ट्रपती पोलीसपदक पुरस्कार प्राप्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय टक्के , बंडू कोकाटे , विलास चौकेकर , वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर , मंगेश शेट्ये , सुनिल शेट्ये , ग्रामपंचायत सदस्य स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , शांताराम धुमाळ , शिडवणे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र टक्के , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ , उपाध्यक्षा समिता सुतार , शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे , पोलीसपाटील समीर कुडतरकर , सचिन टक्के , प्रेरणा कासार्डेकर , माजी अध्यक्ष रजनीकांत चव्हाण , मेघना सुतार , सचिन सुतार , प्रवीण पाटणकर , तारीफ शेख , श्रीराम पाष्टे , गणेश पाष्टे , आन्वी येतकर , स्नेहा पांचाळ , चंद्रकांत पाटणकर , गणेश पाष्टे , अनिल गुंडये , महेश पाष्टे , सत्यवती वारिसे , मानसी रांबाडे , सायली सुतार , अंकिता जाधव , कोमल वारिसे , रेश्मी भोवड , रुपाली पाष्टे , पाटणकरबाई , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि 51 विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.






No comments:
Post a Comment