Monday, June 26, 2023

🛑 मुलांनो , वाचनाची आवड जोपासा : सदानंद ढेकणे

🛑 मुलांनो , वाचनाची आवड जोपासा : सदानंद ढेकणे

🔹निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिली शिडवणे नं.१ शाळेला सदिच्छा भेट

शिडवणे : 

          गतवर्षी शिडवणे नं.१ शाळेला उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील उपशिक्षिका सीमा वरुणकर यांचे अभिनंदन करण्यासाठी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद ढेकणे आले होते. नुकतेच ते पुन्हा एकदा शाळेतील शिक्षकांना भेटण्यासाठी शिडवणे नं.१ येथे आकस्मिक दाखल झाले आणि मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. 

          शिक्षक निवृत्त झाला असला तरी शाळेची ओढ त्याला घरी बसू देत नाही. कित्येक वर्षे शाळेच्या परिसरात , मुलांच्या सहवासात राहिलेले निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद ढेकणे हे विद्यार्थी व  शिक्षकप्रेमी म्हणून ओळखले जातात. 

          ते शाळेत आले आणि मुलांना एकत्र करुन मुलांशी बोलायचे आहे असे म्हणाले. शाळेतील सर्व मुले परिपाठ कक्षात एकत्र करण्यात आली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सदानंद ढेकणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

          मुलांशी हृदय संवाद साधत असताना ते म्हणाले , " मुलांनो , शाळा म्हणजे एक मंदिरच आहे. या मंदिरातील तुम्ही दैवत आहात. तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला शासनाकडून विविध योजनांचा लाभ मिळतो आहे. खूप अभ्यास करा आणि भव्य दिव्य यश मिळवा. त्यासाठी तुम्हाला अतोनात परिश्रम घ्यावे लागतील. भरपूर वाचन करावे लागेल. वाचन तुम्हाला समृद्ध बनवेल. वाचन संस्कृती जोपासा. तुम्ही वाचा आणि सर्वांना वाचन करण्यासाठी प्रेरणा द्या. आवड असली की सवड आपोआप मिळते. वाचनाची आवड जोपासलात तर तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कधीही कमी पडणार नाही. 

          शाळेतील उपक्रमांचे आणि शालेय समित्यांचे त्यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल , उपशिक्षिका सुजाता कुडतरकर , सीमा वरुणकर आणि विद्यार्थीवर्ग यांनी त्यांचे आभार मानले.






No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...