Saturday, August 2, 2025

सुधाकर भोवड यांनी दिले इंग्लिश स्पिकिंग वर्कशॉप

🔴 शिडवणे नं. १ जिल्हा परिषद शाळेत इंग्रजी बोलण्याचा विशेष सराव वर्ग

शिडवणे, (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे नं. १ येथे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी बोलण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. भांडुप-मुंबई येथील सुधाकर भोवड ( मूळ : भोवडवाडी ) यांच्या माध्यमातून इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ३०० इंग्रजी वाक्यांचा विशेष सराव वर्ग नुकताच पार पडला.

गुरुवार, ३१ जुलै २०२५ रोजी हा वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गात भोवड यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात वापरली जाणारी इंग्रजी वाक्ये पुन्हा पुन्हा सराव करुन घेतली. विशेष म्हणजे, याआधीही एप्रिल आणि जून महिन्यांत त्यांनी असे वर्ग घेतले होते. हा त्यांचा तिसरा वर्ग असल्याने त्यांना विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल स्पष्टपणे दिसून आला. मुलांनी शिकलेली वाक्ये आत्मविश्वासाने म्हणून दाखवली.

या उपक्रमामुळे विद्यार्थी घरी जाऊनही या वाक्यांचा नियमित सराव करत आहेत, अशी माहिती मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी दिली. यामुळे शाळेतील शिक्षकांनाही अध्यापनात मदत होत असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमासाठी फलकलेखनाचे सहकार्य पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी यांनी केले.

शाळेतील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, विशेषत: इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती शिडवणे नं. १ आणि शिक्षकवृंद यांनी सुधाकर भोवड यांचे आभार मानले आहेत.










No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...