🔴 शिडवणे नं. १ शाळेत ‘कथ्थक नृत्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न
शिडवणे : येथील शिडवणे नं. १ शाळेत नुकताच 'आनंददायी शनिवार' या उपक्रमांतर्गत कथ्थक नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बाल नृत्य दिग्दर्शिका स्वानंदी प्रवीण कुबल यांनी विद्यार्थिनींना कथ्थक नृत्याचे धडे दिले. यामध्ये त्यांनी गुरुवंदना, प्रारंभिक परीक्षेसाठी आवश्यक असणारे 'तोडे' आणि तालबद्ध हालचाली यांचे प्रात्यक्षिक करून घेतले. स्वानंदीने स्वतः सुंदर सादरीकरण करून सर्व विद्यार्थिनींना नृत्यामध्ये सहभागी करून घेतले.
यावेळी उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर आणि उपशिक्षक सुरेंद्र यादव यांनी मनोगत व्यक्त करत स्वानंदी आणि विद्यार्थिनींचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मुलांना कलेची आवड निर्माण होते आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.











No comments:
Post a Comment