🔴 शिडवणे नं. १ शाळेत ‘शालेय रक्षाबंधन’ सण उत्साहात साजरा
शिडवणे: येथील शिडवणे नं. १ शाळेत ९ ऑगस्ट रोजी ‘शालेय रक्षाबंधन’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा गोड सण साजरा केला.
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ शिवराम जाधव यांच्या कुटुंबाकडून या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत दिली जाते. यावर्षीही त्यांच्या मदतीने हा दिवस अधिक आनंददायी पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
रक्षाबंधनाच्या या विशेष दिवसाचे औचित्य साधून, शालेय पोषण आहार मेनूमध्ये गोड पदार्थ म्हणून शिरा देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, उपशिक्षक सुरेंद्र यादव, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, तसेच शालेय पोषण आहार सेविका समिता सुतार यांसह सर्व शिक्षक व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या वतीने देणगीदार शिवराम जाधव यांच्या कुटुंबाचे आभार मानण्यात आले. त्यांच्या या योगदानामुळेच दरवर्षी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे.












No comments:
Post a Comment