🔴 शिडवणे नं. १ शाळेत रक्षाबंधन निमित्त विशेष पोषण आहार, विद्यार्थ्यांमध्ये आनंद
शिडवणे: शिडवणे नं. १ शाळेत ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने शालेय पोषण आहारामध्ये विशेष गोड पदार्थ शिरा देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना नियमित आहारासोबतच एक गोड पदार्थ मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.
शिवराम जाधव यांच्या कुटुंबाने या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत दिल्यामुळे पोषण आहार मेनूमध्ये हा गोड शिरा समाविष्ट करणे शक्य झाले. त्यांच्या या उदार मदतीबद्दल शाळेने त्यांचे विशेष आभार मानले. जाधव कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून शाळेतील विविध उपक्रमांसाठी मदत करत आहे.
या विशेष पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता. पौष्टिक आहारासोबतच सणाचा गोडवा अनुभवल्याने हा दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, उपशिक्षक सुरेंद्र यादव, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर आणि शालेय पोषण आहार सेविका समिता सुतार हे उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना हा विशेष आहार देण्यात आला.












No comments:
Post a Comment