🔴 शिडवणे नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांचा गणित संबोध परीक्षेत सहभाग
शिडवणे नं. १ (वार्ताहर) - शिडवणे नं. १ येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सध्या गणित संबोध परीक्षेची जोरदार तयारी करत आहेत. या परीक्षेत इयत्ता पाचवीच्या वर्गातून एकूण नऊ विद्यार्थी सहभागी होत आहेत.
या परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शुभ्रा सुनील पांचाळ, धनश्री सुरेश सुतार, वेदिका दिनेश रांबाडे, साक्षी श्रीराम पाष्टे, आर्यन पांडुरंग कासार्डेकर, आयुष अमोल येतकर, उत्कर्ष सचिन टक्के, श्रेयांश सुनील पांचाळ आणि विघ्नेश मंगेश सुतार यांचा समावेश आहे.
सध्या हे सर्व विद्यार्थी गणित विषयातील मूलभूत संकल्पना, आकडेमोड, अपूर्णांक आणि भूमिती यांसारख्या विविध घटकांचा अभ्यास करत आहेत. शाळेचे शिक्षक या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन करत असून, त्यांच्या शंकांचे निरसन करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची तार्किक विचार करण्याची क्षमता वाढावी, यासाठी शाळा व्यवस्थापन विशेष प्रयत्न करत आहे.
या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून, त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी तयार होण्यास मदत मिळत आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे शाळेतील शिक्षक आणि पालकांकडून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment