🔴 शाळा शिडवणे नं. १ मध्ये कंपास पेटी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
शिडवणे: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कंपास पेटी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीमती साक्षी सुनील टक्के यांच्या सौजन्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी महत्त्वाचे साहित्य मिळाल्याने त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागणार आहे.
यावेळी सरपंच रवींद्र शेट्ये, अध्यक्ष दिनेश रांबाडे, उपाध्यक्षा संचिता टक्के, देणगीदार साक्षी सुनिल टक्के आणि सुनील टक्के, तसेच सिद्धी टक्के, रितेश टक्के, बाणे, तारीफ शेख, अरविंद धाक्रस, मानसी रांबाडे, सुरेश भिकाजी कदम, गौरांग कदम, गोविंद वाघरे, उर्मिला सुतार, समिता सुतार, उपशिक्षिका सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि सुरेंद्र यादव यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कंपास पेट्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच रवींद्र शेट्ये, देणगीदार साक्षी टक्के आणि सुरेश कदम यांनी विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. साक्षी सुनील टक्के यांनी मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी देणगीदारांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते. श्री. रामदास वारिसे यांनी मुलांना खाऊसाठी ५०० रुपयांची देणगी दिली, तर श्रीमती साक्षी सुनील टक्के यांनी शाळेला अधिक शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी २००० रुपयांची अनमोल भेट दिली.
शाळेच्या वतीने साक्षी टक्के कुटुंबीयांना त्यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, 'गणपतीची आकर्षक मूर्ती' भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. प्रवीण कुबल यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.





























No comments:
Post a Comment