Tuesday, August 12, 2025

शिडवणे नं. १ शाळेला रोटरी क्लब खारेपाटणतर्फे २० झाडांची देणगी

 


शिडवणे नं. १ शाळेला रोटरी क्लब खारेपाटणतर्फे २० झाडांची देणगी

शिडवणे: खारेपाटण येथील रोटरी क्लबने शिडवणे नं. १ शाळेच्या पर्यावरण संवर्धनासाठी एक अनोखी भेट दिली आहे. नवनिर्वाचित रोटरी क्लब अध्यक्ष, रोटरियन दयानंद कोकाटे यांच्या पुढाकाराने शाळेला एकूण २० विविध प्रकारची झाडे देणगी म्हणून मिळाली आहेत.

    यामध्ये नारळाची पाच, फणसाची दोन, सुपारीची दहा, आंब्याची दोन आणि जांभळाचे एक झाड यांचा समावेश आहे. ही सर्व झाडे शाळेच्या आवारात लावून नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यास मदत करणार आहेत.

    या झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १३, १४ किंवा १५ ऑगस्ट या तीन दिवसांपैकी एका दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर लगेचच पाच ते दहा मिनिटांत हा वृक्षारोपण सोहळा पार पाडण्याचे नियोजन आहे.

    या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सर्व पदाधिकारी, मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांना रोटरी क्लब खारेपाटण आणि शाळा व्यवस्थापनातर्फे नम्र आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडेल आणि विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्वही समजण्यास मदत होईल.




No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...