Monday, August 18, 2025

🔴 शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी घेतली गणेश कार्यशाळेला भेट

🔴 शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी घेतली गणेश कार्यशाळेला भेट

शिडवणे: सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी शिडवणे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या विद्यार्थ्यांनी 'क्षेत्रभेट' कार्यक्रमांतर्गत गावातील प्रसिद्ध शिल्पकार सुनील पांचाळ यांच्या चित्रशाळेला भेट दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले मूर्तींचे काम पाहताना मुलांना वेगळाच अनुभव मिळाला.

          मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी विद्यार्थ्यांना गणपतींच्या मूर्तींबद्दल सखोल माहिती दिली. प्रत्यक्ष रंगकाम आणि मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रिया पाहताना मुलांचे चेहरे आनंदाने फुलले होते. विविध प्रकारच्या आणि आकर्षक चित्रांनी सजवलेल्या गणपतींच्या मूर्ती पाहून विद्यार्थी थक्क झाले. हे गणपती शिडवणे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाणार आहेत. अशाप्रकारे अनेक गणपतींना एकाच ठिकाणी पाहण्याचा दुर्मिळ अनुभव मुलांना मिळाला.

          शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अशा क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. या भेटींमुळे विद्यार्थ्यांना भविष्यात चांगले शिल्पकार आणि कलाकार घडण्यास प्रेरणा मिळते.

          या प्रसंगी शाळेच्या वतीने बाल शिल्पकार श्रेयांश सुनील पांचाळ याला 'विठ्ठल मूर्ती' भेट देऊन गौरवण्यात आले. शिल्पकार सुनील पांचाळ यांनी मुलांना त्यांच्या चित्रशाळेला भेट देण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

          यावेळी उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर आणि पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी उपस्थित होत्या.
































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...