🔴 शिडवणे नं. १ शाळेत रानभाज्या महोत्सव संपन्न
शिडवणे: कृषी महाविद्यालय, सांगुळवाडीच्या कृषी दूतांनी आयोजित केलेला 'रानभाज्या महोत्सव' शिडवणे नं. १ शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला शिडवणे आणि भोवडवाडीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ शेतकरी शाम भोवड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी कृषी दूतांनी पॉलिहाऊस, मत्स्य व्यवस्थापन, आणि परिसरातील विविध प्रकारच्या रानभाज्यांविषयी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
शिडवणे आरोग्य मंदिराचे डॉ. प्रणव पाटील यांनी कृषी दूतांचे आभार मानले. प्रमुख कृषी दूत राहुल पळसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून रानभाज्या महोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. ज्येष्ठ शेतकरी जयराम गिरकर, विद्यार्थी शफा शेख आणि तनिष्का पाटणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात शेवगा, भारंगी, हळदीची पाने, बांबूचा कोंब, आळंबी, टाकळा, कुर्डू, गवती चहा अशा अनेक रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. याप्रसंगी माजी उपाध्यक्षा समिता सुतार, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, शिक्षिका हेमा वंजारी यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शेतकरी तुकाराम भोवड, राम काकवे, संतोष गुंडये, भिकाजी भोवड, राजाराम भोवड, महिपत लाडके आणि बहुसंख्य महिला शेतकरी उपस्थित होत्या.






































No comments:
Post a Comment